अशोक चव्हाणांकडून नाना पटोलेंना त्यावेळीच ऑफर होती!

नागपूर | भाजपमध्ये राहून विरोध करण्यापेक्षा नाना पटोलेंनी काँग्रेसमध्ये यावं, असं काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले होते. 7 नोव्हेंबरला अमरावतीत झालेल्या काँग्रेस जनआक्रोश मेळाव्यात ते बोलले होते.

भाजपचे भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. मात्र चव्हाणांनी गेल्या महिन्यातच त्यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती.

दरम्यान, पटोलेंनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे त्यांचा राजीनामा सुपूर्द केला. पटोले मोदी सरकार, फडणवीस सरकार यांच्यावर थेट टीका करत होते.