बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् अशोक चव्हाणांनी शेअर केला विलासरावांच्या भाषणाचा ‘तो’ जुना व्हिडीओ

मुंबई | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यावर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचा एक जुना व्हिडिओ शेअर करत ममता बॅनर्जीं यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीकास्त्र सोडले आहेत. (Ashok Chavan shared old video of Vilasrao’s speech)

अलिकडे काँग्रेसबद्दल काही मंडळींना झालेल्या गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर विलासराव देशमुख यांच्या वक्तव्याची सहज आठवण झाली असं कॅप्शन देत त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विलासराव देशमुख म्हणतात, “काँग्रेसची चाल बुद्धिबळातील हत्तीसारखी सरळ आणि थेट धडक देणारी आहे. काँग्रेस उंटासारखी तिरकी चालत नाही अन् घोड्यासारखी अडीच घरही जात नाही.”

दौऱ्यादरम्यान ममता बॅनर्जींनी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul gandhi) यांच्यावर देखील जहरी टीका केली. परदेशात राहून राजकारण करता येत नाही, रस्त्यावर उतरला नाहीत तर भाजप तुमचा क्लीन बोल्ड करेल, असा टोला बॅनर्जींनी राहुल गांधींना लगावला. तुम्ही काँग्रेसविरोधात का लढत आहात?, असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी भाजपला पराभूत करण्यासाठीचा हा लढा असल्याचं म्हटलं. काँग्रेस आणि डावे पक्ष बंगालमध्ये आमच्या विरोधात लढल्यामुळे काँग्रेसविरोधात आम्ही कंबर कसली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी ममता बॅनर्जींच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. जेव्हा तुम्ही लढवय्यांबद्दल अशी टीका करता, तेव्हा त्याचा भाजपला फायदा होतो. मला वाटतं की, ममता ईडी आणि सीबीआयला घाबरुन अशी वक्तव्ये करत आहेत. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे फक्त भाजपलाच फायदा होणार आहे. हे टाळण्यासाठी अशी वक्तव्य देखील टाळायला हवीत असंही खर्गे म्हणाले.

पाहा व्हिडीओ-


थोडक्यात बातम्या-

‘या’ कंपनीच्या फोनचा मोठ्ठा स्फोट, ब्रँडचं नाव ऐकाल तर धक्काच बसेल

अवकाळी पावसाचा राडा, त्यातच हवामान खात्याकडून ‘या’ मोठ्या संकटाचा इशारा

कोणता झेंडा घेऊ हाती?, एक-दोन नव्हे तर ‘या’ नेत्याने केलं पाचव्यांदा पक्षांतर

महाराष्ट्रातील ‘या’ शहराचं टेंशन वाढलं, नायजेरियातून आलेल्या मायलेकी पॉझिटीव्ह

“मी मेल्यानंतर…..” सर्वांना हसवणाऱ्या कुशल बद्रिकेची भावनिक पोस्ट

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More