“देशात एकमेकांना संपवण्याचा कार्यक्रम सुरू”; अशोक चव्हाणांचं टीकास्त्र
नांदेड | मुंबईत शिवसेना (Shivsena) आणि राणा दाम्पत्यांमध्ये (Rana Family) शाब्दिक बाचाबाची सुरू आहे. तर इकडं नांदेडमध्ये सभेत बोलताना मंत्री अशोक चव्हाण (PWD Minister Ashok Chavan) यांनी केंद्र सरकारवर (Central Government) जोरदार टीका केली आहे. देशात सध्या चालू असलेल्या कारवायांवरून चव्हाण यांनी केंद्र सरकार विरोधकांना त्रास देत असल्याची टीका केली आहे. चव्हाण यांनी अनेक मुद्द्यांचा आधार घेत ही टीका केली आहे.
समाजसुधारक महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा चव्हाण यांच्या हस्ते नांदेडमध्ये पार पडला. यावेळी चव्हाण यांनी बसवेश्वरांच्या विचारांची गरज असल्याच मत व्यक्त केलं आहे. बाराव्या शतकात लोकशाहीची मुल्य रूजवण्याचं काम बसवेश्वरांनी केल्याचं चव्हाण म्हणाले आहेत. बसवेश्वरांच्या विचारांचा आधार घेत चव्हाण यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली आहे.
देशाच्या प्रगतीत आणि विकासात सगळ्यांचा हातभार लागला पाहीजे पण सध्या देशात एकमेकांना संपवण्याचा कार्यक्रम चालू असल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे. लोकशाहीत राजकीय विरोध असायला पाहीजे पण राज्यात जे वातावरण सध्या बनलं आहे ते चुकीचं आहे. याला संपवा, त्याला संपवा हे महाराष्ट्रात चालणार नाही, असं चव्हाण म्हणाले आहेत.
दरम्यान, मुंबईत हनुमान चालीसावरून गोंधळ सुरू आहे तर काही ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून राजकारण पेटलं आहे. राज्यात सध्या अनेक मुद्द्यांवरून तणाव वाढत असल्याचं दिसत आहे.
थोडक्यात बातम्या –
“मौका सभी को मिलता है”; नितेश राणेंचा ठाकरे सरकारला इशारा
आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या लेकींची कमाल; अंशू आणि राधिकानं रौप्यपदक पटकावलं
पालकांनो सावधान! लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय, तज्ज्ञांनी दिला ‘हा’ सल्ला
“बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर…”; शरद पवारांनी कान टोचले
“…अन् प्रसाद ओक यांना पाहताच एकनाथ शिंदे पाया पडले”; पाहा व्हिडीओ
Comments are closed.