मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी बीडमध्ये संविधान बचाव सभेत केलेल्या वक्तव्यावर आव्हांडांनी स्पष्टीकरण दिलं आहे. यावर काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी समाचार घेतला आहे.
जितेंद्र आव्हाडांनी वेळीच खुलासा केला ते बरं झालं. तरी मी यासंदर्भात एक नक्कीच सांगेन की कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.
देशाची एकता व अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावणार्या इंदिराजी गांधी आजही संपूर्ण जगात कणखरता व कर्तबगारीसाठी परिचित आहेत, असंही चव्हाणांनी म्हटलं आहे.
दरम्यान, देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीदेखील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं.
देशाची एकता व अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावणार्या इंदिराजी गांधी आजही संपूर्ण जगात कणखरता व कर्तबगारीसाठी परिचित आहेत. @Awhadspeaks यांनी वेळीच खुलासा केला ते बरे झाले. तरी मी यासंदर्भात एक नक्कीच सांगेन की, कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) January 29, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
महाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते- आदित्य ठाकरे
“शिवसेनेला काँग्रेसचा पाठींबा म्हणजे 21 व्या शतकातील आश्चर्य आहे”
महत्वाच्या बातम्या-
इंदिरा गांधींबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण
ऐसे कैसे चलेगा खानसाब?; पुणे पोलिसांचं ट्विट
ठाकरे सरकारच्या स्थापनेनंतर संजय राऊत पहिल्यांदाच मंत्रालयात
Comments are closed.