बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्राने आरक्षणाचा अधिकार राज्यांना दिला म्हणजे आरक्षणाचा मार्ग मोकळा हा गैरसमज कारण…- अशोक चव्हाण

मुंबई | मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्राने 102 घटनादुरुस्तीचा प्रस्ताव मान्य केला आहे. आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना बहाल करण्याचा निर्णय आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यावर मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बोलताना, आरक्षणाचा अधिकार राज्यांना मिळाला म्हणजे आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला गैरसमज असल्याचं म्हटलं आहे.

महाराष्ट्र सरकारला 50 टक्क्यांच्या वर आरक्षण देता येत नाही. त्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण देता आलं नाही ही वस्तुस्थिती आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज आरक्षण देण्यासंदर्भातले अधिकार राज्यांना बहाल करण्याच्या बाबतीत मंजुरी दिली आहे. त्यामुळे लोकांच्या मनात गैरसमज होऊ शकतो, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

जोपर्यंत 50 टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिल केली जात नाही. तोपर्यंत राज्यांना अधिकार देऊन काहीही साध्य होणार नसल्याचं चव्हाण म्हणाले. आज फक्त अधिकार देऊन अर्धवट काम केलं आहे. ढकलाढकलीच्या कामातून काही निष्पन्न होईल असं वाटत नाही, असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही. महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष आणि केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातूनच हा प्रश्न मार्गी लागू शकत असल्याचं अध्यक्ष अशोक म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“राज्यपालांचा जो मान ठेवला पाहिजे त्याला धक्का देण्याचं काम केलं जात आहे”

घाई करा! आगामी काळात सोन्याचे दर दुप्पट होणार, वाचा आजचे दर

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

काय सांगता! कुत्रा मागे लागताच रेड्यानी ठोकली धूम, व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल पोट धरून

‘फडणवीसांचा टॅटू मी ह्रदयावर काढणार होतो पण…’; हातावर टॅटू काढलेल्या नरेंद्र पाटलांची प्रतिक्रिया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More