बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून अशोक चव्हाणांनी मानले खासदार संभाजीराजेंचे आभार

नवी दिल्ली | मागील 6 वर्षांपासून रखडलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बुधवारी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय दिला आहे. यावरून आता महाराष्ट्रात राजकारण तापू लागलं आहे. पण त्यानंतर देखील मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या खासदार संभाजी राजे यांचं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कौतुक करत आभार मानले आहेत.

मराठा आरक्षण लढ्यात खासदार संभाजी राजे यांनी नेहमीच सकारात्मक आणि राजकीय अभिनिवेष नसलेली भूमिका घेतली आहे. सामाजिक चळवळीत अशीच भूमिका ठेवून काम करणं गरजेचं असतं. त्याशिवाय चळवळीला यश मिळू शकत नाही. खासदार यांचे प्रयत्न आणि सहकार्यासाठी मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे, असं ट्विट अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

मराठा समाजासाठी हा दुर्दैवी दिवस आहे. हा निर्णय मराठा समाजासाठी दुर्दैवी आहे. सर्व सरकारांनी त्यांची बाजू मांडली आहे. मागील सरकारनं कायदा मंजूर केला. सगळ्यांनी आपली बाजू मांडली. शेवटी निकाल हा निकाल असतो, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे भोसले यांनी दिली होती.

दरम्यान, 102 व्या घटनादुरुस्तीनंतर राज्याला कायदा करण्याचा अधिकार राहिलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार नसताना कायदा केला होता. मराठा आरक्षणाचा कायदा 102 व्या घटनादुरुस्तीनंतर केल्यानं सुप्रीम कोर्टानं रद्द केला, असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला होता.

थोडक्यात बातम्या-

‘कोरोनाची तिसरी लाट अटळ’; केंद्र सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांचं भाकीत

चिंताजनक! गेल्या 24 तासात देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय वाढ

 माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजित सिंह चौधरींचं कोरोनामुळे निधन

कोरोना लसीचा दुसरा डोस घ्यायला उशीर झाल्यास लस परिणाम करेल का?; वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात…

रिषभ पंतची ऐतिहासिक कामगिरी; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More