आगामी निवडणुकांचं युद्ध जिंकायचं आहे, फेकू सरकार पाडायचं आहे- अशोक चव्हाण

नागपूर | आगामी निवडणुकांचं युद्ध जिंकायचं आहे, फेकू सरकार पाडायचं आहे. असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नागपूर येथे जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.

चव्हाण यांनी यावेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भाजपवर सडकून टीका केली. या सरकारकडून मोठ्या अपेक्षा होत्या मात्र त्यांनी सर्व अपेक्षांचा भंग केला आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, वल्लभभाई पटेल यांच्या पुतळा उभा केला याचा आम्हाला अभिमान आहे. मात्र पुतळ्याचे उद्घाटन करण्याची त्यांची तेवढी पात्रता नाही, असा खोचक टोला त्यांनी पंतप्रधान मोदींना मारला. 

महत्वाच्या बातम्या-

-शरद पवार पंतप्रधान होतील असं वाटत नाही- रामदास आठवले

-“आता मोदी चहा विकणार आणि अमित शहा वडे विकणार”

-…अन् ‘स्वाभिमानी’चे नेते नारायण राणे भाजपच्या निवडणूक जाहिरनामा बैठकीला हजर!

-“राफेल घोटाळ्यामुळे 56 इंचाच्या छातीत धडकी भरली आहे”

-राजकारण्यांनी इतर क्षेत्रात हस्तक्षेप करु नये, साहित्य संमेलनात गडकरींचा सल्ला

Google+ Linkedin