मुंबई | मराठा आरक्षणासंदर्भातील अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणीसाठी तातडीने घटनापीठ स्थापन करण्यात यावं, याकरिता राज्य सरकारने 18 नोव्हेंबरला चौथ्यांदा आपला अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता. आता या अर्जाबाबत लवकरात लवकर निर्णय होणार होणार असून येत्या आठ दहा दिवसात घटनापिठाची स्थापना होऊन सुनावणी होणार असल्याचे संकेत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत.
राज्य शासनाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळण्याचे संकेत आहेत. एसईबीसी आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती हटविण्याबाबत राज्य शासनाने केलेल्या अर्जानुसार घटनापिठाची स्थापना होऊन आठ ते दहा दिवसात सुनावणी होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती अशोक चव्हाणांनी दिली आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.
एसईबीसी आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती हटविण्याबाबत राज्य शासनाने केलेल्या अर्जावर येत्या 9 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता पाच सदस्यीय घटनापिठासमोर सुनावणी होणार, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलंय.
राज्य शासनाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळण्याचे संकेत आहेत.#एसईबीसी आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती हटविण्याबाबत राज्य शासनाने केलेल्या अर्जानुसार घटनापिठाची स्थापना होऊन आठ ते दहा दिवसात सुनावणी होण्याची अपेक्षा आहे.#मराठाआरक्षण
— Ashok Chavan (@AshokChavanINC) December 4, 2020
#एसईबीसी आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती हटविण्याबाबत राज्य शासनाने केलेल्या अर्जावर येत्या ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता पाच सदस्यीय घटनापिठासमोर सुनावणी होणार. #मराठाआरक्षण
— Ashok Chavan (@AshokChavanINC) December 4, 2020
महत्वाच्या बातम्या-
“फक्त नवरदेवाने लग्नाची घाई करुन होत नाही, घरच्यांनीही मनावर घेतलं पाहिजे”
“अमर, अकबर, अँथनी’ हिट!; रॉबर्ट सेठ हरला”
शेतकरी आंदोलनामुळे भाजपला मोठा झटका, ‘या’ राज्यातील सत्ता जाणार?
“जिल्हा परिषदेच्या शाळांना नावं ठेवणाऱ्यांना डिसले गुरुजी हेच योग्य उत्तर”
“जेवढा त्रास पवारसाहेबांना द्याल, दुप्पट जनता तुम्हाला देईल”
Comments are closed.