बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“केंद्राने कातडी बचाव धोरण स्विकारु नये”; केंद्र सरकारच्या याचिकेवर टीका

मुंबई | 5 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अनेक तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारच्या पारड्यात टाकला होता. मुख्यमंत्र्यांनी याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट देखील घेतली होती. यावर आता केंद्र सरकारने एक पाऊल टाकत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यावर मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा आरक्षणासह देशभरातील इतरही राज्यांच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारने कातडी बचाव धोरण स्वीकारू नये. तर 102 व्या घटना दुरुस्ती सोबतच इंद्रा साहनी प्रकरणातील 50 टक्के आरक्षण मर्यादेच्या निवाड्याच्या फेरविचारासाठीही सर्वोच्च न्यायालयाला विनंती करावी, अशी मागणी काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

102 व्या घटना दुरुस्तीमुळे राज्यांकडे सामाजिक आणि शैक्षणिक स्वरुपात मागासवर्ग घोषित करण्याचा अधिकार नाही, असं न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यांच्या घटनापीठातील तीन सदस्यांचे म्हणते होते. राज्यघटनेतील 102 व्या दुरुस्तीने राज्य सरकारला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांची यादी बनवण्याचा अधिकार संपत नाही, असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करून आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. तशीही ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींनी सुद्धा मान्य केलीच आहे. तातडीने ही फेरविचार याचिका दाखल केल्याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा महाराष्ट्रातील ‘या’ देवस्थानचा मोठा निर्णय

मोठी बातमी ! मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका

लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम?; मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट

महाविकास आघाडीत बिघाडी?; राष्ट्रवादी विरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशी खडाजंगी

“पंतप्रधानांनीही पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली, तेव्हा त्यांचा धर्म भ्रष्ट झाला का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More