राष्ट्रवादीने आघाडी धर्म न पाळल्याने काँग्रेसचा पराभव- अशोक चव्हाण

मुंबई | राष्ट्रवादीने आघाडी धर्म न पाळल्याने काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत पराभव पहावा लागला आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचं कारण आघाडीतील गटतट असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. ते मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असणाऱ्या काँग्रेस आमदारांवर कारवाई होणार नसल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. काँग्रेस आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणं चुकीचं नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडीमध्ये बिघाडी झाली असल्याचं चित्र दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

-मला ‘वंचित’ हा शब्दच आवडत नाही- उदयनराजे भोसले

-गुन्हा रद्द झालेला नाही; धनंजय मुंडेंनी दिशाभूल करू नये- राजाभाऊ फड

-बिहार सरकारने वृद्धांसाठी केली ‘या’ नव्या पेन्शन योजनेची घोषणा

-डॉक्टरांनी उपचारास नकार दिल्याने नवजात बाळाचा मृत्यू

-रामराजेंकडून उदयनराजेंची पिसाळलेल्या कुत्र्याशी तुलना