महाराष्ट्र मुंबई

“भारताच्या इतिहासात जे कधीही घडलं नाही, ते आता मोदी सरकारच्या कारकिर्दीत घडणार”

Photo Courtesy- Facebook/Narendra Modi

मुंबई | पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सलग बाराव्या दिवशी वाढ झाल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. भारताच्या इतिहासात जे कधीही घडलं नाही, ते आता मोदी सरकारच्या कारकिर्दीत घडणार असल्याचं दिसत आहे, अशी बोचरी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे.

नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीसाठी मागील केंद्र सरकारांना जबाबदार ठरवलं होतं. याला देखील अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

एप्रिल 2014 मध्ये कच्च्या तेलाची किंमत 110 डॉलर असताना मुंबईत पेट्रोल 80 अन् डिझेल 63 रूपयांना मिळत होते. आज कच्चे तेल 65 डॉलरला असताना मुंबईत पेट्रोल 96.30 तर डिझेल 87.30 रुपयांवर आहे. यासाठी केवळ मोदी सरकारची नफेखोरी कारणीभूत आहे, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त होत असताना मोदी सरकारने सतत कर वाढवले. सर्वसामान्यांच्या खिशावर तब्बल 20 लाख कोटी रुपयांचा डल्ला मारला. तेच पंतप्रधान आज पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीसाठी यापूर्वीच्या सरकारांना जबाबदार धरतात, हे हास्यास्पद आहे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

लस घेतल्यानंतरही उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण!

…तर मी माझी खासदारकी फेकून देतो- खासदार संभाजीराजे

बाबो! एक थाळी संपवा अन् मिळवा एक तोळ सोनं, जाणून घ्या ही भन्नाट ऑफर

महाराष्ट्रसह देशातील ‘या’ राज्यातही कोरोनारूग्णांचा वाढला आकडा

इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, दिली ‘या’ तीन चेहऱ्यांना संधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या