Top News आरोग्य कोरोना नांदेड

फक्त तुम्ही काळजी घ्या, कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही- अशोक चव्हाण

नांदेड | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. नांदेड जिल्ह्यामध्येही कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवासुविधेत कोणतीही कमतरता भासणार नाही असं वक्तव्य पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केलंय.

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेनिमित्त अशोक चव्हाण यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी अशोक चव्हाण म्हणाले, “कोरोनाचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण प्रशासन प्रयत्न करतंय. या लढ्यात मी स्वतः शासन पातळीवर दक्ष असून कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही.”

पालकमंत्री पुढे म्हणाले, “नागरिकांनीही यामध्ये स्वतःची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाकडून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं. जिल्ह्यातील आरोग्याच्या प्रश्नाबाबत मी प्रशासनाबाबत आरोग्य बैठका घेत असतो. त्यामुळे आरोग्य सुविधेत कोणतीही कमरता राहणार नाही यासाठी नियोजन करत आहोत.”

“आयसीयूंच्या खांटामध्ये नवी भर पडली असून अतिगंभीर रूग्णांवर प्राधान्याने उपचार केले जातील. तर काही प्रमाणात वाहतुकीच्या कारणामुळे ऑक्सिजनचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र ऑक्सिजनचा तुटवडा नसून वाढत्या संख्येच्या प्रमाणात त्याचं व्यवस्थापन जिल्हा प्रशासनामार्फत योग्य पद्धतीने केलं जाणार असल्याचं,” चव्हाण यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मला सुशांतच्या नावाचा गैरवापर करुन मिळणारी प्रसिद्धी नकोय- निया शर्मा

‘मराठा आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्व संभाजीराजेंनी करावं’; ‘या’ शिवसेना खासदाराची मागणी

दिलदार माणूस! कोरोनाच्या काळातही रतन टाटांनी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केला कोट्यवधींचा बोन

…तर एटीएममधून पैसे काढताना ओटीपीची आवश्यकता, SBI चा नवा नियम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या