औरंगाबाद | निवडणुकीच्या रिंगणात विरोधात असलेल्या उमेदवारांची प्रशंसा करणं अपेक्षित असतं का?, असा सवाल काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अशोक चव्हाण बोलत होते.
लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने वंचित भाजपची ‘बी टीम’ असल्याची टीका केली होती. यानंतर प्रकाश आंबेडकरांनी आम्ही भाजपची ‘बी टीम’ आहोत हे सिद्ध करून आमची माफी मागावी, असं म्हटलं होतं. यावरच अशोक चव्हाण यांनी सवाल केला आहे.
दरम्यान, धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावं ही काँग्रेसची भूमिका आहे. यामुळे प्रकाश आंबेडकर यांना विधानसभेला सोबत घेण्याची चर्चा सुरू आहे, असं बाळासाहेब थोरातांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-प्रवीण गायकवाड यांनी सोडली काँग्रेसची साथ, धरला राष्ट्रवादीचा हात!
-धक्कादायक! मुंबईच्या महापौरांची महिलेसोबत गैरवर्तणूक
-मोदी युगपुरूष, त्यांना भारतरत्न द्या; संसदेत मागणी
-शिवरायांचा आशीर्वाद घेऊन राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ
-उत्तराखंडमध्ये शाळेची बस दरीत कोसळून मोठा अपघात!
Comments are closed.