बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिला राजीनामा

मुंबई |  लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाच्या पार्श्वभूमीवर नैतिक जबाबदारी स्विकारत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला आहे.

महाराष्ट्रात काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राज्यात काँग्रेसला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

उत्तर प्रदेशातली काँग्रेस पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्विकारात राज बब्बर यांनीही राजीनामा दिला आहे. तर अमेठीत राहुल गांधी यांची जबाबदारी स्विकारून जिल्हाध्यक्ष योगेश मिश्रा यांनीही राजीनामा दिला आहे.

काल काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये स्वत: राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर ठाम होते. परंतू पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना राजीनामा देण्यापासून रोखलं.

महत्वाच्या बातम्या

-पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला नरेंद्र मोदींना फोन!

-तारीख ठरली!!! मैं नरेंद्र दामोदरदास मोदी शपथ लेता हूँ…

-‘या’ आहेत देशातल्या सर्वांत तरूण खासदार; या मतदारसंघातून झाल्यात विजयी

-मी ‘हे’ काम केल्यावरच पुढच्या विधानसभेला मतदान मागायला जाईन- जगनमोहन रेड्डी

-हत्या झालेल्या कार्यकर्त्याच्या पार्थिवाला स्मृती इराणींनी दिला खांदा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More