मुंबई | वंचित बहुजन आघाडीमुळे राज्यात काँग्रेस आघाडीच्या 9 ते 10 जागांवर परिणाम झाला आणि यामुळे काँग्रेसला राज्यात पराभवाला सामोरं जाव लागलं आहे, असा आरोप काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे.
वंचित बहुजन आघाडीमुळे राज्यात काँग्रेस आघाडीच्या ९ ते १० जागांवर परिणाम झाला. वंचितला बरोबर घेण्याचा आम्ही प्रयत्न केला पण ते आले नाहीत. वंचितने भाजपाची बी टीम म्हणूनच काम केले, त्याचा फटका आम्हाला बसला आणि फायदा भाजप-शिवसेनेला झाला.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) May 25, 2019
वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. पण ते आले नाहीत. याचाच फटका आम्हाला बसला आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत वंचितने भाजपची ‘बी टीम’ म्हणूनच काम केलं आहे. त्याचा फायदा मात्र शिवसेना आणि भाजपला झाला, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
प्रदेशाध्यक्ष या नात्याने काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी मी घेतो. त्याबद्दल मी कोणाला दोषी ठरवत नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
-…म्हणून या मुस्लिम महिलेने तिच्या बाळाचे नाव नरेंद्र मोदी ठेवले!
-काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा राजीनामा नामंजूर
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना दिला ‘हा’ सल्ला
-राहुल गांधींच्या ‘या’ कृतीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली
-नारायण राणेंचं काँग्रेस प्रवेशाबाबत मोठं वक्तव्य
Comments are closed.