महाराष्ट्र

भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला- अशोक चव्हाण

मुंबई | पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झालं आहे. आज या निवडणुकांची मतमोजणी होत असून धुळे नंदुरबारमध्ये भाजपच्या अमरीश पटेलांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

अमरीश पटेल यांच्या विजयानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला आहे, असा घणाघात अशोक चव्हाण यांनी केला.

दुसऱ्याच्या घरातील चोऱ्या करायच्या आणि त्याला आपली संपत्ती म्हणायचं असाच प्रकार भाजप करत आहे, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

भाजपने ही चोरी केली आहे. आम्हाला 5 जागांपैकी अनेक जागा मिळतील. तसेच आमचं आघाडीचं सरकार देखील पाच वर्षे टिकेल, असा विश्वास अशोक चव्हाणांनी व्यक्त केलाय.

महत्वाच्या बातम्या-

बीएचआर घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही; गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण

“शेठजी लायटिंग छान होती आणि तुमचा डान्स तर लाजवाबच”

अमरीश पटेल यांचा विजय सत्ताधाऱ्यांसाठी मोठा राजकीय धक्का- गिरीश महाजन

शीतल आमटेंच्या आत्महत्येबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या