नांदेड महाराष्ट्र

‘भारत बंद’ यशस्वी करून झोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागं करा- अशोक चव्हाण

नांदेड | कृषी कायद्यांबाबत केंद्राची भूमिका ताठर असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारत बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन अशोक चव्हाणांनी केलं आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्यांंसंदर्भात केंद्र सरकारने झोपेचे सोंग घेतले असून, त्यांना जागे करण्यासाठी 8 डिसेंबरचा ‘भारत बंद’ महत्वाचा आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या सहकार्याने हे आंदोलन यशस्वी करून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात केंद्रावरील दबाव वाढवावा, असं आवाहन अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

भाजप सोडून सर्व राजकीय पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या भावना आणि कायदे कसे शेतकरी विरोधी आहेत, हे केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावं, असं अशोक चव्हाण म्हणाले.

सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही, हे चित्र असल्याने शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘परिस्थिती सुधारली नाही तर…’; छगन भुजबळांचा नाशिककरांना इशारा

“राहुल गांधी आणि कुटुंब पार्टटाईम राजकारण करतात, शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही”

“भारत बंदमध्ये शेतकरी संघटना सहभागी होणार नाही”

शेतकऱ्यांचं आंदोलन राजकीय हेतूने सुरू असल्याचं वाटतं- अनुपम खेर

“नव्या संसदेसाठी, स्पेशल विमानासाठी पैसा आहे, मात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या