महाराष्ट्र मुंबई

मुंबईत बॉलिवूडचं वास्तव्य, सोयी-सुविधा असताना उत्तरप्रदेशात कोण जाईल?- अशोक चव्हाण

मुंबई | बॉलिवूडचं वास्तव्य महाराष्ट्रासह मुंबईत आहे. मुंबईत सर्व सोयी-सुविधा असताना उत्तरप्रदेशात कोण जाईल, असा प्रश्न काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे.

महाराष्ट्र किंवा मुंबईत बॉलिवूडचं वास्तव्य आहे. अनेक कलाकार हे मुंबईत राहणारे आहेत. मुंबईत सवलती सोयी, फिल्मसिटी, लोकेशन यासारख्या विविध ठिकाणं आहेत. काही वेळा परदेशात जाऊनही शूटींग केली जाते. त्यामुळे कोणी मुद्दाम बॉलिवूड कुठे घेऊन जावू नये, असं अशोक चव्हाण म्हणाले.

शूटींग करण्याइतपत लोकेशन महाराष्ट्रात आहेत. फिल्मसिटी आहे.सर्व गोष्टी आहेत. एवढं असताना कोणी युपीला जाईल, असे वाटत नाही, असंही अशोक चव्हाणांनी सांगितलंय.

भाजपच्या 5 वर्षाच्या काळात दिवसाढवळ्या महाराष्ट्रातील अनेक उद्योग अन् कार्यालये गुजरातला पळवण्यात आली. आता महाराष्ट्रातील सरकार बदलले तर उत्तरप्रदेश सरकारच्या नावाखाली बॉलीवूडचे लचके तोडण्याची पटकथा तयार झालेली दिसते. पण भाजपच्या काळात जे झाले ते आम्ही पुन्हा घडू देणार नाही, असं अशोक चव्हाण म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

“मास्क न घालणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये काम करण्याची शिक्षा द्या”

तुटवडा की छपाई बंद???; आता एटीएममध्ये मिळणार नाहीत ‘या’ नोटा!

“मराठा आरक्षण हा राजकीय विषय नाही, मराठा समाजाचं नुकसान होऊ नये हीच माझी प्रमाणिक भावना”

“बाप तरी दाखवा नाहीतर श्राद्ध घाला ही वेळ आली आहे… मराठा आरक्षण दिरंगाईला….”

संजय राऊत लिलावती रूग्णालयात होणार दाखल; अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या