बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला- अशोक चव्हाण

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द ठरवलं आहे. यावर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. आजचा निकाल निराशाजनक आहे. मराठा समाजसाठी, महाराष्ट्रावर अन्याय करणारा निकाल आहे, असं त्यांनी म्हटलंय.

राज्यात हा विषय असताना संपूर्ण संविधानिक प्रक्रिया पूर्ण करुन निर्णय घेण्यात आला. त्यानंतर कॅबिनेटनं  कायदा मंजूर केला. मुंबई उच्च न्यायालयात आरक्षण टिकलं. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. फडणवीस सरकारनं जे वकील लावले होते. तेच वकील महाविकासआघाडी सरकारनं वकील लावले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जितक्या बैठका घेतल्या नसतील तितक्या बैठका घेतल्या गेल्या, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

सर्वाच्या सहकार्यानं सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडली. महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टात बाजू मांडली त्यात समन्वयाचा अभाव कधीही नव्हता, असंही अशोक चव्हाण म्हणाले.

102 वी घटनादुरुस्ती 14 ऑगस्ट 2018 ला झाली. 15 नोव्हेंबर 2018 ला गायकवाड समितीचा अहवाल आला. 30 नोव्हेंबरला कायदा केला. 102 व्या घटनादुरुस्तीनंतर राज्याला अधिकार राहिलेला नाही, असं सुप्रीम कोर्टानं निक्षून सांगितलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार नसताना कायदा केला होता. त्यानंतर आता फसवणूक केली जात आहे. मराठा आरक्षणाचा कायदा 102 व्या घटनादुरुस्तीनंतर केल्यानं सुप्रीम कोर्टानं रद्द केला, असं अशोक चव्हाण म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच ममता बँनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांच्यात वाक् युद्ध

मराठा आरक्षणप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला हा महत्त्वाचा सल्ला!

मराठा आरक्षणावरून उद्धव ठाकरेंनी जोडले केंद्र सरकारसमोर हात; केलं ‘हे’ आवाहन

पुण्याला मिळाला लसींचा मोठा साठा; उद्यापासून सुरू होणार 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण

पोलिसांना माणुसकी आली अंगलट; रोजा सोडण्यासाठी आरोपीला सोडलं अन्…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More