बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करण्याचं काही राजकीय पक्षाचं षडयंत्र”

मुंबई | मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लावण्याचा काही राजकीय पक्षांचं षडयंत्र असल्याचा आरोप मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.

मराठा समाजाला ओबीसींचं आरक्षण देण्याचा प्रश्नच येत नाही. तरीही काही लोक गैरसमज पसरवत आहेत. मराठा आणि ओबीसींमध्ये वाद लावण्याचं काही राजकीय पक्षांचं हे षडयंत्र आहे, असं अशोक चव्हाण म्हणालेत.

हे कोण लोक आहेत हे तुम्हाला कळेल. राजकीय हेतू ठेवून कोणी हा प्रकार करत आहे का हे पाहिलं पाहिजे. जे लोक प्रामाणिकपणे आंदोलन करत आहेत. त्यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय.

कुणावरही अन्याय व्हावा, असं आम्हाला वाटत नाही. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यावर आमचा भर आहे. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणात ढवळाढवळ करण्याचा प्रश्नच येत नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

“खडसेंनी देवेंद्र फडणवीसांबद्दलचा पोटशूळ आणि तिरस्कार कमी करावा

मी निवृत्त होतेय पण…- पी. व्ही. सिंधू

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांशी आमचा संबंध नाही- गिरीश महाजन

‘माणुसकीचा फ्रीज’, कोणीही उपाशी पोटी झोपू नये यासाठी मनसेचा उपक्रम

“इतना सन्नाटा क्यूँ है भाई?, सुशांतप्रकरणी सीबीआय महिनाभरापासून गप्प का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More