महाराष्ट्र मुंबई

“मराठा आरक्षण हा राजकीय विषय नाही, मराठा समाजाचं नुकसान होऊ नये हीच माझी प्रमाणिक भावना”

मुंबई | मराठा आरक्षण हा राजकीय विषय असू शकत नाही. फ़डणवीस सरकारने घेतलेले मुद्देच आम्ही पुढे घेऊन जात आहोत. मराठा समाजाचं नुकसान होऊ नये हीच माझी प्रामाणिक भावना आहे, असं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलंय.

अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीला अशोक चव्हाण, मंत्री एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर अशोक चव्हाणांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

EWS किंवा SCBC या दोघांपैकी एक काहीतरी घ्या, असे कोर्टाने म्हटलं आहे. त्यातील सारांश तरी तेच सांगत आहे. त्यामुळे हायकोर्टाचे निर्णय, EWS बद्दलच्या मागण्या आणि उर्वरित काही मागण्या याबाबत चर्चा झाली, असं अशोक चव्हाण म्हणालेत.

सुप्रीम कोर्टात चार वेळा लेखी दिलं आहे. कोरोनामुळे कोर्टाची सुनावणीही व्हिडीओद्वारे होतं आहे. त्यामुळे जोपर्यंत या ठिकाणी घटनात्मक खंडपीठ स्थापन होत नाही. तोपर्यंत याला चालना मिळणार नाही. यासाठी सरकारी वकील, सरकार मदत करत आहेत, असंही अशोक चव्हाण यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

संजय राऊत लिलावती रूग्णालयात होणार दाखल; अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय

कोरोना लस कधी येणार माहिती नाही, पण…- राजेश टोपे

मुंबईला मिळालेला बॉलिवूडचा दर्जा संपणार नाही- नवाब मलिक

राहुल गांधी बँकॉकमध्ये कोणत्या शेतीचा अभ्यास करत आहेत- भाजप

जलयुक्त शिवार योजना ही सर्वाधिक लोकप्रिय, मात्र सरकारकडून सूड बुद्धीने चौकशी- राम शिंदे

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या