महाराष्ट्र मुंबई

थोरातांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवा; अशोक चव्हाणांचं सोनियांना पत्र?

मुंबई | दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्षामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर दिसून आला. अशातच महाराष्ट्रातील काँगेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि मंत्री अशोक चव्हाण यांच्यातील अंतर्गत कलह समोर आला आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे आणि ते पत्र लिहिलंय बाळासाहेब थोरात यांना महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदारून दूर करा या मागणीसाठी…! याबाबतचं वृत्त एबीपी न्यूज हिंदीने दिलं आहे.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माझी वर्णी लावावी, अशी मागणी त्यांनी पत्राच्या माध्यमातून सोनिया गांधींकडे केल्याचं माहिती समजत आहे.

दरम्यान, अशोक चव्हाण यांची याबाबत कोणतीही बाजू समोर आली.  हे पत्र खरंच चव्हाण यांनी लिहिलं आहे का? आणि जर लिहिलं असेल तर त्यांना खरंच काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद हवं आहे का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

शरद पवारांचं गृहमंत्र्यांना पत्र; पोलिसांसाठी केली ‘ही’ मागणी

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदूरीकर महाराजांना पहिला झटका!

महत्वाच्या बातम्या-

“सावरकरांबद्दल जे लिहिलंय ते ऐतिहासिक वस्तुस्थितीला धरूनच; मासिक मागे घेणार नाही”

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदूरीकर महाराजांना पहिला झटका!

‘सत्ता जाऊन सहा वर्षे झाली तरी अनेकजण मंत्र्यासारखेच वागतात’; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या