महाराष्ट्र मुंबई

मराठा तरुणांना गुन्हेगार ठरविण्याचं मुख्यमंत्र्यांचं षडयंत्र!

मुंबई | मोर्चे काढणाऱ्या मराठा समाजातील तरुणांना गुन्हेगार ठरविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते.

सरकारचा विरोध करणाऱ्यांना गुन्हेगार ठरविण्याचे षडयंत्र राज्यात सुरू अाहे. शेतकऱ्यांनी मोर्चा काढला की त्यांना नक्षलवादी म्हणायचे. एल्गार परिषदेला माओवादी ठरवायचे. हा सरकारचा एककलमी कार्यक्रम आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी ते स्वतः वारकरी विचारांचे आहेत की धारकरी विचारांचे आहेत हे आधी स्पष्ट करावे, असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आमदारांविरोधात तीव्र संताप; श्रद्धांजलीचे फोटो व्हायरल

-महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ‘तो’ जुना फोटो व्हायरल

-मराठा आंदोलनाला दिशा देण्यासाठी पुण्यात बैठक सुरू

-आणखी एका मराठा तरुणाची कोरड्या नदीपात्रात उडी 

-मराठा आंदोलनात काही पेड लोक घुसले आहेत- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या