अशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री???

नवी दिल्ली | राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावर अशोक गेहलोत यांची निवड होण्याची शक्यता असून याबाबत अधिकृत घोषणा चार वाजता करण्यात येणार आहे.

अशोक गेहलोत आणि सचिन पायलट हे मुख्यमंत्री पदासाठी प्रमुख दावेदार होते. मध्य प्रदेशप्रमाणे जेष्ठ नेत्यालाच राजस्थानमध्ये काँग्रेस संधी देणार असल्याचे समजते.

आज सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांनी स्वतंत्रपणे राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करावे यासाठी त्यांच्या समर्थकांनी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयासमोर घोषणा दिल्या आहेत.

दरम्यान, काँग्रेसला पाठींबा देणाऱ्या अपक्ष आमदारांनीही अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

-निवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले!

-‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….

-माहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल

-तीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक

“इतर राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही”