Ashok Murtadak | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू असतानाच मनसेला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे यांच्या नाशिकच्या दौऱ्यापूर्वीच त्यांना उद्धव ठाकरे यांनी मोठा धक्का दिलाय. मनसेच्या बड्या नेत्याने थेट हातात शिवबंधन बांधले आहे. राज ठाकरे यांच्यासाठी हा ऐन निवडणुकीत मोठा धक्का मानला जातोय. (Ashok Murtadak)
नाशिकचे माजी महापौर आणि मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी ठाकरे गटात जाहीर प्रवेश केलाय. अशोक मुर्तडक हे नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना अडीच वर्ष महापौर होते. त्यांनी शिवबंधन बांधल्याने नाशिकमध्ये ठाकरे गटाची ताकद वाढणार असल्याचं बोललं जातंय.
सध्या अशोक मुर्तडक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रदेश सरचिटणीस या पदावर कार्यकर्त होते. आता त्यांनी मनसेला रामराम ठोकला आहे. अशोक मुर्तडक हे नाशिकमधून विधानसभा लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र, त्यांच्याऐवजी प्रसाद सानप यांना उमेदवारी देण्यात आल्याने मुर्तडक हे नाराज होते. अशात त्यांनी (Ashok Murtadak) थेट मनसेला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरेंची साथ निवडली आहे.
कोण आहेत अशोक मुर्तडक?
अशोक मुर्तडक हे मनसेच्या तिकिटावर नाशिक महापालिकेच्या नगरसेवकपदी निवडून आले. 2014 मध्ये नाशिकच्या महापौरपदासाठी राज ठाकरे यांनी मुर्तडक यांना संधी दिली होती. त्यांनी अडीच वर्ष नाशिकचं महापौरपद भूषवलं आहे. अशोक मुर्तडक (Ashok Murtadak)हे राज ठाकरे यांचे विश्वासू मानले जात होते. त्यांनी आता ऐन विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांना धक्का देत उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलाय.
दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल 15 नोव्हेंबररोजी ‘आम्ही हे करू’ या यावाने आपला जाहीरनामा प्रकाशीत केला आहे. यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष्य देण्यात आलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जाहीरनाम्यात चार महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. महिला, तरुण, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा आणि आश्वासन देण्यात आली आहेत.
News Title : Ashok Murtadak join thackeray group
महत्वाच्या बातम्या –
रोहित शर्माच्या आयुष्यात ‘ज्युनिअर हिटमॅन’ची एंट्री; पत्नी रितिकाने दिला मुलाला जन्म
आज शनिदेवाच्या कृपेने ‘या’ राशींच्या मनोकामना पूर्ण होणार!
‘स्वाभिमानासाठी एकजुटीने….’; संभाजी पाटील निलंगेकरांचं मतदारांना आवाहन
…म्हणून भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला गुरूद्वाऱ्यातून बाहेर काढला!