बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दहशतवादी संघटनांनीही जेवढं नुकसान केलं नाही तेवढं गांधी परिवाराने केलं”

नवी दिल्ली | दहशतवादी संघटनांनीही जेवढं नुकसान केलं नाही तेवढं गांधी परिवाराने केलं असल्याचं चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

आपल्या फायद्यासाठी गांधी परिवाराने काश्मिरमधल्या दहशतवादाला खतपाणी घातलं. आणीबाणी लागू केली, नक्षलवादात वाढ झाली. दहशतवादी संघटनांनीही एवढं नुकसान केलं नाही जेवढं गांधी परिवाराने केलं असल्याची टीका अशोक पंडितांनी केली आहे.

राहुल गांधी, तुमचा पक्ष गिलानींच्या उपचारासाठी दिल्लीतल्या पंचतारांकित रुग्णालयावर कोट्यावधींचा खर्च करतो. गिलानी हे हजारो काश्मिरी हिंदूंच्या मृत्यूचं कारण ठरले आहेत. शत्रूंसोबत उभं राहणं हे तुमच्या रक्तातच आहे, असंही अशोक पंडित यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच राहुल गांधींनी यांनी स्टेन स्वामी यांच्या मृत्युनंतर श्रद्धांजलीचं ट्विट केलं होतं. यावरूनही अशोक पंडित यांनी गांधींवर निशाणा साधला.

दरम्यान, राहुल गांधींचं एक ट्विट हे गेल्या 70 वर्षांमध्ये काँग्रेसने नक्षलवादाला केलेलं समर्थन आणि पोषण दाखवून देतं. हजारो सैनिक शहीद झाले, नक्षली गाव मागास राहिले आणि देशाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे. हा सर्व चीनचा कट असल्याचं अशोक पंडितांनी म्हटलं आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

‘वासरू मारलं म्हणून कुणी गाय मारत असेल, तर…’; फडणवीसांचा सूचक इशारा

“…पण हे मुंबई मॉडेल नाही, तर मृत्यूचं मॉडेल”

“12 आमदारांचं निलंबन हा लोकशाहीचा खून”

अधिवेशनादरम्यान आजही सभागृहात राडा; आमदार रवी राणांनी विधानसभेतील ‘राजदंड’ पळवला

हेलिकॉप्टरमधून नवरदेवासोबत खासदार अमोल कोल्हेंनी केली दमदार एन्ट्री!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More