मराठी अभिनेत्यानं नाकारली छावा सिनेमातील भूमिका, आता समोर येऊन सांगितलं खरं कारण

Ashok Shinde Rejected a Role in ‘Chhava’ for Marathi Audience

Chhava | छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. अवघ्या दोन आठवड्यांत छावाने २०० कोटींचा टप्पा पार केला असून प्रेक्षकांकडून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात अनेक मराठी कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकले आहेत. मात्र, एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने छावा चित्रपटातील भूमिका नाकारली असून त्यामागचं कारण त्यांनी स्पष्ट केलं आहे. (Chhava)

अशोक शिंदेंनी ‘छावा’मधील भूमिका का नाकारली?

ज्येष्ठ अभिनेते अशोक शिंदे (Ashok Shinde) यांना छावा चित्रपटात एका विशिष्ट भूमिकेसाठी विचारणा झाली होती. मात्र, त्यांनी ती भूमिका स्वीकारण्यास नकार दिला. त्यांनी एका मुलाखतीत या निर्णयामागचं कारण स्पष्ट करताना सांगितलं की, मराठी प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमासमोर बॉलिवूडमध्ये लहान भूमिका साकारणं त्यांना योग्य वाटलं नाही.

अशोक शिंदे म्हणाले, “लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी मला ‘छावा’साठी एक भूमिका ऑफर केली होती. पण त्यावेळी माझं ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेसाठी कॉन्ट्रॅक्ट होतं. मला त्यांनी जो रोल ऑफर केला तो अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्या पोस्टरसमोर ठेवलेला होता. विकी कौशल (Vicky Kaushal) संभाजी महाराजांची भूमिका साकारत होता, रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) महत्त्वाच्या भूमिकेत होती. पण मला विचार आला की हा चित्रपट मी करावा का?”

नेमकी कोणती होती ती भूमिका?

शिंदे यांनी उतेकर यांना विचारलं की, “ही भूमिका मी का करावी?” त्यावर दिग्दर्शकांनी त्यांना गेस्ट अपिअरन्सचा प्रस्ताव दिला. मात्र, त्यांनी सांगितलं की, “माझे १३ कोटी मराठी प्रेक्षक आहेत. त्यांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. जर मी ही भूमिका केली, तर त्यांच्या भावना दुखावल्या जातील. त्यामुळे मी तो रोल करण्यास नकार दिला.” (Chhava)

अशोक शिंदेंना नकारात्मक भूमिका देण्यात आली होती, जिथे त्यांचं पात्र संभाजी महाराजांविषयी माहिती सांगतं आणि नंतर त्याचा मृत्यू होतो. त्यांनी स्पष्ट सांगितलं की, “या भूमिकेमुळे मराठी प्रेक्षकांवर अन्याय होईल असं मला वाटलं. म्हणून मी ती भूमिका स्वीकारली नाही.”

Title : Ashok Shinde Rejected a Role in ‘Chhava’ for Marathi Audience

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .