पुणे | ‘पानिपत’कडे साम्राज्याचा पराभव म्हणून पाहिलं जातं. पण पानिपत हा चेष्टेचा विषय नाही. हे शाळेतच शिकवलं पाहिजे, अशी अपेक्षा प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी व्यक्त केली आहे. ते सत्कार समारंभावेळी त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे.
‘पानिपत’ हा सिनेमा मी पॅशनने बनवला असल्याची भावनाही गोवारीकरांनी व्यक्त केली. गोवारीकर यांचा ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी ‘पानिपत’बाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.
लहानपणी ‘पानिपत’बद्दल मला काहीही माहिती नव्हतं. त्यामध्ये ऐकण्यासारखंही काही नाही असं सांगितलं जायचं. पण आई-वडिलांनी १२ व्या वर्षी पानिपत पुस्तक हातात दिलं. ते वाचून मी प्रभावित झालो. त्या पुस्तकामध्ये मराठ्यांचा इतिहास वाचून अंगावर काटा उभा राहिला, असं गोवारीकर यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, मराठी चित्रपटाला १०० वर्षे झाली तरीही कोणालाच इतिहासावर मराठी सिनेमा का करावासा वाटला नाही?, असा सवालही गोवारीकरांनी विचारला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
- अन्यायाविरोधात बोलणं म्हणजे नक्षलवाद नाही- शरद पवार
- आम्ही करु शरद पवारांचे रक्षण; महाराष्ट्र केसरी सरसावले!
महत्वाच्या बातम्या-
- सत्य बाहेर येण्याच्या भीतीने ‘एनआयए’कडे तपास दिला; शरद पवारांचा आरोप
- “आर.आर.पाटलांनंतर आता राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता करतोय भिडेंचा बचाव”
- देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ व्याख्यानावर काँग्रेसचा आक्षेप; शिक्षणमंत्र्यांना धाडलं पत्र
Comments are closed.