अवघ्या 17 व्या वर्षी नाण्यांवर पुस्तक, आशुतोषचा भीम पराक्रम!

पुणे | वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी स्वतःचं पुस्तक लिहिणं, तेही प्राचीन नाण्यांसारख्या ऐतिहासिक विषयात… औरंगाबादच्या आशुतोष पाटीलनं हा भीम पराक्रम केलाय. 

“पश्चिमी क्षत्रपांची नाणी” असं त्याच्या पुस्तकाचं नाव आहे. कर्वे रोडवरील सोनल हॉलमध्ये ‘कॉईनेक्स पुणे-2017’ या जागतिक नाणे प्रदर्शनात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. जेष्ठ नाणकशास्त्र अभ्यासक श्री. प्रशांत कुलकर्णींच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं.

यावेळी जेष्ठ नाणी संग्राहक अशोक सिंग, अरविंद आठवले, रणविजय सिंग, बस्ती सोलंकी  उपस्थित होते. आशुतोषचं हे पुस्तक आपल्याला अॅमेझॉन.कॉम या वेबसाईटवरुनही खरेदी करता येऊ शकतं.