Top News

“पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे वागणार नाही ना… मला काही सांगायचं आहे”

Loading...

कोल्हापूर | सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं. आता या प्रकरणाची चौकशी होण्यासाठी आश्विनी बिंद्रे यांच्या पाचवीत शिकणाऱ्या मुलीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे.

मी माझ्या आईचा शोध घ्यावा यासाठी त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर सकाळी 11पासून रात्रीपर्यंत थांबले होते. त्यावेळी मुख्यमंत्रीसाहेब दिवसभर कार्यालयात होते. पण आम्हाला ते भटले नाहीत. आणि आता बाबा बोलतो, उद्धव साहेबांना भेटायचं त्यामुळे मला ते दिवस आठवतात आणि भिती वाटत असल्याचं सिद्धीने पत्रात म्हटलं आहे.

माझीही शिवशाहीच्या मुख्यमंत्र्यांना भेटायची इच्छा आहे. आपण पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे वागणार नाही ना…आपण माझ्यासाठी वेळ द्याल ना…..मला बोलायचं आहे, असं भावनिक पत्र सिद्धीने उद्धव ठाकरेंना पाठवलं आहे.

आईचा मृतदेह मिळाला पण या तपासासाठी वडील राजू गोरे यांनाही सतत न्यायालयाच्या कामासाठी मुंबईला जावे लागत आहे. त्यामुळे तेही भेटत नसल्याची तक्रार केली आहे. वडीलांच्या जीवालाही धोका असल्याचंही तिनं या पत्रात म्हटलं आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

अहो फडणवीस, हिंमतीची भाषा करायला जिगर लागते- अमोल मिटकरी

चांगल्या डॉक्टरकडे जाण्याची गरज; नवाब मलिकांचा भाजप नेत्यांना सल्ला

महत्वाच्या बातम्या-

सध्या माझे वाईट दिवस सुरु आहेत- इंदुरीकर महाराज

मुंबईत जीएसटी भवनाला भीषण आग; अग्निशमनच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल

म्हणून मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषचं होतंय कौतुक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या