निवडणूक आयोगाचा अश्विनी जगताप यांना दणका!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

चिंचवड | पिंपरी चिंचवडच्या भाजपच्या उमेदवार (Bjp) अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाने मोठा दणका दिलाय. अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे.

निवडणूक आयोगाने त्यांना पेड न्यूज (Paid News) प्रकरणी नोटीस धाडली आहे. भाजप उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना पैसे देऊन बातमी प्रकाशित करण्यावरून नोटीस बजावण्यात आली आहे.

पोट निवडणूकीच्या रणधुमाळीत आयोगातर्फे चालू घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी माध्यम प्रमाणीकरण आणि सह नियंत्रण समिती अर्थात एमसीएमसी नेमण्यात आली आहे.

या प्रकरणी निवडणूक आयोगाने अश्विनी जगताप यांचं लेखी उत्तर मागवलं आहे. 20 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला अश्विनी जगताप यांनी खुलासादेखील पाठवला आहे.

दरम्यान, मतदार संघातील पोट निवडणूक जाहीर झाल्यापासून सुमारे 43 लाख रुपयांची रोकड, चार लाख 97 हजार 625 रुपये किंमतीचे मद्य आणि 94 हजार 750 रुपयांचा 3  किलो 584 ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-