पुण्यातील ‘या’ मतदारसंघात उमेदवारानं निकालाआधीच उधळला गुलाल!

Pune Vidhansabha

Pune Vidhansabha l महाराष्ट्रात काल विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीनंतर राज्यातील उमेदवाराचं भवितव्य मतदान पेटीत बंद झालं आहे. अशातच आता दोन दिवसांनी म्हणजेच 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. मात्र आता त्यापूर्वीच पुण्यात 2 विजयी उमेदवारांचे बॅनर झळकले आहेत. त्यामुळे आता पुण्यातील दोन उमेदवार चांगलेच चर्चेत आले आहेत.

कोणत्या विधानसभा मतदारसंघात झळकले बॅनर :

काल मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतरच पुण्यात विजयाचे बॅनर झळकले आहेत. पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आहे. यावेळी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार अश्विनी कदम यांच्या विजयाचे बॅनर झळकले आहेत. यावेळी पुण्यातील सारसबाग गणपती मंदिरासमोर अश्विनी कदम यांच्या विजयाचे बॅनर्स झळकल्याने संपूर्ण राज्यभरात चर्चा सुरू आहे.

कारण विधानसभा निकालापूर्वीच पुणे शहरातील अनेक मतदारसंघांमध्ये विजयी जल्लोष साजरा केला आहे. याशिवाय पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात महायुतीतील भाजपच्या माधुरी मिसाळ आणि महाविकास आघाडीच्या अश्विनी कदम यांच्यात जोरदार लढत झाली आहे. यावेळी पुण्यातील एकमेव विधानसभा मतदारसंघ ज्या मतदारसंघात महिला उमेदवार आहेत. मात्र या मतदारसंघात अश्विनी कदम यांच्या कार्यकर्त्यांकडून विजयापूर्वीच बॅनरबाजी करण्यात आली आहे.

Pune Vidhansabha l दोडकेंची मिरवणूक मतदारसंघात चर्चेचा विषय :

याशिवाय पुण्यातील खडकवासला मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन दोडके यांनी देखील विजयी मिरवणूक काढली आहे. यावेळी कार्यकर्तांनी फटाके फोडत आणि सचिन दोडके यांना खांद्यावर घेत भव्यदिव्य अशी मिरवणूक काढली आहे.

मात्र यावेळी सचिन दोडकेंची मिरवणूक मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत आहे. कारण मतदान संपताच सचिन दोडके यांच्या विजयाचे फ्लेक्स देखील झळकले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांकडून कार्यालयाच्या बाहेर देखील जोरदार जल्लोष करण्यात येत आहे.

News Title – ashwini kadam & Sachin Dodke took out the victory procession

महत्त्वाच्या बातम्या-

विधानसभेतही अजितदादा बॅकफूटवर; लोकसभेची पुनरावृत्ती होणार का?

मविआचा मुख्यमंत्री कोण असेल? संजय राऊतांनी दिलं उत्तर

राज्यात कुणाचं सरकार येणार?, प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकीत समोर

‘या’ गोष्टींमुळे सरकार आमचंच येणार; भुजबळांना अतिविश्वास

राज ठाकरे ठरणार किंगमेकर?, मनसेबाबत काय सांगते एक्झिट पोल्सची आकडेवारी?

 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .