Ashwini Kasar | मुंबईची लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाईफलाइन आहे. या लोकल ट्रेनमुळे मुंबईकरांचे जीवन सुरळीत चालते. त्यांना लोकलचा प्रवास खूप परवडतो. मात्र, याच लोकल ट्रेनमध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्रीला धक्कादायक अनुभव आलाय. लोकल प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे.
अशात बऱ्याचदा गर्दी होऊन जाते. काही प्रवासी तर अगदी भांडतात सुद्धा. काही वेळा तर ट्रेनमध्ये अतिशय बेशिस्तपणे वागतात.काहीसा असाच अनुभव मराठी अभिनेत्रीला आला आहे. लोकल ट्रेनमध्ये समोरच्या महिला प्रवासीला आपल्या बाजूच्या आसनावर पाय ठेवू न दिल्याने अभिनेत्री अश्विनी कासारसोबत (Ashwini Kasar) वाद घालत धमकी देण्यात आली आहे.
लोकल ट्रेनमध्ये अभिनेत्रीला वाईट अनुभव
अभिनेत्री अश्विनी कासार ही छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे चांगलीच लोकप्रिय झाली आहे. सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशात अश्विनीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लोकल ट्रेनच्या प्रवासा दरम्यान आलेला अनुभव शेअर केला आहे.
अश्विनीने (Ashwini Kasar) आपल्या स्टोरीमध्ये मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलिसांना देखील टॅग केले आहे. तिने घडलेल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. याबाबत एक व्हिडिओ देखील त्यांनी पोस्ट केलाय.
अश्विनी कासारने सांगितला धक्कादायक अनुभव
अभिनेत्री अश्विनी कासारने (Ashwini Kasar) आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओत तिने मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलिसांना टॅग केले आहे. आपल्या पोस्टमध्ये तिने म्हटले की, “या बाईंचं नाव मला माहित नाही. ट्रेनमध्ये यांना माझ्या सीटवर पाय समोर ठेऊन बसायचं होतं. मी नकार दिल्यावर मला लाथ मारण्यात आली. भांडणात मी मराठी भाषा वापरली तर त्यांना त्याचाही प्रॉब्लेम होता. मी पब्लिक इमेज आहे हे कळल्यावर मला धमक्या देण्यात आल्या. माझा मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलिसांवर पूर्णपणे विश्वास आहे.”,अशी पोस्ट अभिनेत्रीने केलीये.
अश्विनी कासारच्या या पोस्टवर आता चाहते देखील संताप व्यक्त करत आहेत. चाहत्यांकडून बेशिस्त प्रवाशांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्रात मराठी बोलण्याला विरोध करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जातोय.
News Title – Ashwini Kasar share bad experience in local train
महत्त्वाच्या बातम्या-
“..म्हणून राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला नाही”; अजितदादांचा शरद पवारांवर गंभीर आरोप
गुरू रंधावा करतोय शहनाज गिलला डेट, म्हणाला “मला खूप छान वाटतं…”
अग्रवाल कुटुंबामुळे माझ्या मुलाने… तक्रारदार पित्याच्या आरोपांनी पुण्यात पुन्हा खळबळ
मुनव्वर फारुकीने दुसऱ्यांदा उरकलं लग्न?, ‘त्या’ फोटोमुळे चर्चेला उधाण
सुनील टिंगरेंच्या अडचणी वाढल्या, डॅाक्टरच्या प्रकरणात पुन्हा आलं नाव