बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पीयूष गोयल यांच्याकडून रेल्वे मंत्रालय काढलं, या मंत्र्याची रेल्वेमंत्रिपदी वर्णी

नवी दिल्ली | केंद्रातील मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना मोदी सरकारने आपल्या मंत्रिमंडळात संधी दिली आहे. तर  मंत्री पीयुष गोयल यांच्याकडून रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी काढण्यात आली आहे.

पहिल्या पर्वातील नोकरशाहीत आपला ठसा उमटवलेल्या आश्विनी वैष्णव यांचा मोदी मंत्रिमंडळात रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पीयुष गोयल यांच्याकडे आता केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचाही कारभार सोपवण्यात आला आहे. मात्र आश्विनी वैष्णव या नव्या खासदाराकडे मोठा कारभार देण्यात आल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.

आश्विनी वैष्णव यांनी कमी संख्याबळावर त्यांनी विजय मिळवला होता. ओडिशातून भाजपच्या तिकिटावर राज्यसभा निवडणूक जिंकले होती. राजस्थानच्या जोधपूरमध्ये जन्मलेले 51 वर्षी वैष्णव हे 1994 च्या बॅचचे ओडिशा कॅडरमधील आयएएस अधिकारी आहेत.

दरम्यान, आज मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर शपथविधी सोहळा पार पडला आणि खातेवाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. महाराष्ट्रातील 4 भाजप नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामील करून घेतलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा आभारी”

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप जाहीर; वाचा कोणाला कोणतं मंत्रिपद?

दिलासादायक! पुण्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल, वाचा आजची आकडेवारी!

सहकार क्षेत्रासाठी मोदी सरकारचं मोठं क्रांतिकारी पाऊल; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबईतील कोरोना रूग्णसंख्या वाढली; वाचा आजची आकडेवारी एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More