बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयटी मंत्रिपदाचा कार्यभार हाती घेताच अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरला खडसावलं

नवी दिल्ली  | मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या काल विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये आयटी मंत्रालय हे अश्विनी वैष्णव यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. भारताच्या नवीन माहिती व तंत्रज्ञान कायद्याबद्दल नवीन आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारताच ट्विटरला इशारा दिला आहे.

दरम्यान, माध्यमांशी ट्विटरच्या मनमानीबद्दल बोलताना अश्विनी वैष्णव यांनी कायदा हा सर्वांसाठी समान असून त्या कायद्याचं पालन करणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे हा एक प्रकारे ट्विटरला इशाराच असल्याचं म्हटलं जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून ट्विटर विरुद्ध केंद्र सरकार असा वाद पेटला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाचा कार्यभार नव्या मंत्र्यांनी स्वीकारल्यामुळे त्यांनी ट्विटरला नियमांचं पालन करण्यास खडसावून सांगितलं आहे. त्यातच आता दिल्ली उच्च न्यायालयात ट्विटरने आपण भारतात संपर्क कार्यालय सुरू करणार असल्याचे म्हटले आहे.

ट्विटरने आज दिल्ली उच्च न्यायालयात स्पष्टीकरण दिल्याप्रमाणे येत्या आठ आठवड्यात ट्विटर भारतामध्ये तक्रार अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे. पोटात मी आज दिल्ली उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं असून त्यामध्ये तक्रार निवारण अधिकारी हा भारतातीलच असून भारतातच त्याचं कार्यालय असणार आहे असं स्पष्ट केलं आहे. 

 

थोडक्यात बातम्या – 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More