बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आसिफ खान आणि रसिका आडगावकारचा विवाहसोहळा धुमधडाक्यात संपन्न

नाशिक |  आसिफ खान आणि रसिका आडगावकार या दोघांचं नाव गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. आसिफ  हा एक मुस्लिम धर्मातील मुलगा आणि रसिका एका हिंदू धर्मातील मुलगी आहे. यामुळे काही संघटना आणि सामाजाने या दोघांच्या विवाहाला लव्ह जिहादचं नाव देत विरोध दर्शवला होता. मात्र, आज या दोघांचा विवाहसोहळा धुमधडाक्यात संपन्न झाला आहे.

आसिफ आणि रसिका या दोघांनी 21 मे रोजी रजिस्टर पद्धतीने विवाह केला होता. यानंतर या दोघांनी धार्मिक पद्धतीने विवाह करण्याचं ठरवलं. दोन्ही कुटुंबांच्या संमतीनुसार 18 जुलै रोजी दोघांचा विवाह निश्चित करण्यात आला. यानंतर या दोघांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि काही संघटनांनी या नात्याला लव्ह जिहादचं नाव दिलं.

हा विवाह लव्ह जिहाद असल्याचं म्हणत काही लोकांनी रसिकाच्या कुटुंबावर दबाव टाकला आणि हा विवाह रद्द करण्यास भाग पाडलं. यासंदर्भात वृत्त प्रसारित झाल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह अनेक पुरोगामी संघटनांनी या विवाहाला पाठिंबा दर्शवला. यामुळे आडगावकर आणि खान कुटुंबाने पुन्हा हा विवाह मोठ्या थाटामाटात करण्याचं ठरवलं.

आज अखेर दोन्ही कुटुंबांनी कोणाच्याही विरोध आणि धमक्यांना न जुमानता हिंदू पद्धतीने धुमधडाक्यात हे लग्न लावून दिलं. या विवाहाला टोकाचा विरोध होऊन देखील विवाह सोहळा थाटात पार पडल्यानं रसिकाचे वडील प्रसाद आडगावकर यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘गरज भासल्यास अमित शहांसोबत बोलणार’; कोकणातील पूर परिस्थितीवर नारायण राणेंची प्रतिक्रिया 

आनंदाची बातमी! राज्याचा रिकव्हरी रेट 96 टक्क्यांवर, वाचा आजची आकडेवारी

राज कुंद्रा प्रकरणातील अभिनेत्री गहना वशिष्ठचा नवा धक्कादायक दावा

दिलासादायक! पुण्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल, वाचा आजची आकडेवारी!

पुणेकरांना एवघ्या एका रुपयात पेट्रोल, अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More