बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसला धक्का! ‘हा’ माजी आमदार लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार

नाशिक | काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख हे लवकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय. येत्या 25 मार्चला आसिफ शेख मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

आसिफ शेख आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. आसिफ शेख यांच्यासोबत त्यांचे समर्थक आणि काही नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.

गेल्या महिन्यात आसिफ शेख यांनी काँग्रेसला रामराम करत पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली होती. त्यानंतर ते कोणत्या पक्षात जातील याची उत्सुकता अनेकांना लागली होती. आसिफ शेख राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर आसिफ शेख यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाला आहे.

गेल्या वीस वर्षापासून मी काँग्रेसमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम केले. प्रामाणिकपणे काम करताना मालेगावातील जनतेची सेवा केली. माझ्या वैयक्तिक कारणासाठी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करुन पुढील दिशा ठरवली जाईल. कोणत्या पक्षात प्रवेश करायचा हे सर्वस्वी कार्यकर्त्यांच्या निर्णयावरच अवलंबून असेल. 15 दिवसानंतर अंतिम निर्णय घेऊ, असं आसिफ शेख म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या- 

अन् पती पत्नीनं रचला इतिहास; राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच जुळून आला ‘असा’ योग!

नवनीत राणांची बाजू घेत सरकारवर टीका करणाऱ्या चित्रा वाघ यांना चाकणकरांनी सुनावलं, म्हणाल्या…

मुलगी दिली नाही म्हणून त्याने मुलीच्या आईलाच फूस लावून पळवलं, अन्…

जास्त मद्यपान केल्यामुळे मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम मिळणार का?, सर्वोच्च न्यायालय म्हणालं…

मी शिवसैनिक आहे, आम्ही महिलांना धमकावण्याचं काम करत नाही- अरविंद सावंत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More