महाराष्ट्र मुंबई

शेळ्या-मेंढ्या चारल्या म्हणून गुन्हे दाखल करणं थांबवा- असीम सरोदे

मुंबई | शेळ्या-मेंढ्या सरकारी जागेवर चरण्यावरुन मेंढपाळांवर गुन्हे दाखल होणे थांबले पाहिजे. वनविभाग व पोलिसांनी मेंढपाळांचे असे गुन्हेगारीकरण थांबवावे. तसेच सरकारने प्रत्येक जिल्ह्यात शेळ्या-मेंढ्यांना चरण्यासाठी धनगरांना स्वंतत्र जागा आणि चराई कुरण उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी मानवीहक्क कार्यकर्ते अ‌ॅड. असीम सरोदे यांनी केली आहे.

हातावर पोट भरणाऱ्या मेंढपाळ कुटुंबांची काळजी घेणे गरजेचे आहे. धनगर हे पारंपरिक पद्धतीने शेळी-मेंढीपालन करतात. महाराष्ट्रात तीन लाखांच्यावर लोकसंख्या असलेल्या या समूहासाठी, स्थलांतरित मेंढपाळांना सुरक्षितता मिळावी म्हणून सरकारने जबाबदारी घेतलीच पाहिजे, असं असीम सरोदे यांनी म्हटलंय.

महाराष्ट्रातील मेंढपाळांच्या समस्यांवर आयोजित बैठकित असीम सरोदे बोलत होते. या ऑनलाइन मीटिंगमध्ये भटक्या विमुक्त जाती-जमातींचे अभ्यासक, शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

मेंढपाळांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासन योग्य उपाय योजना का करीत नाही? असा प्रश्न यावेळी शिक्षणातज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी उपस्थित केला.

ट्रेंडिंग बातम्या-

…तर कोरोनाची ही लढाई कदापि जिंकता येणार नाही- देवेंद्र फडणवीस

‘कोणाच्या धमकीला घाबरत नाही’; चंद्रकांत पाटलांचं हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर

महत्वाच्या बातम्या-

अकोला कारागृहातील तब्बल 50 कैद्यांना कोरोनाची लागण

शुभमंगल साssवधान!, लग्नासाठी बोलावलेल्या पाहुण्यांपैकी 15 जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह

राज्यात आज 5493 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती?

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या