विधानसभा निकालाविरोधात न्यायालयात जाणार?, ‘त्या’ पोस्टने खळबळ

Asim Sarode | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल अखेर काल 23 नोव्हेंबररोजी जाहीर झाला. महायुतीला राज्यातील मतदारांनी कौल दिला आहे. अंतिम निकालात एकूण 288 जागांपैकी 234 जागांवर महायुतीने बाजी मारली. तर, महाविकास आघाडीला केवळ 50 जागा जिंकता आल्या.त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. लवकरच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा देखील पार पडणार आहे. (Asim Sarode)

या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेते पडले आहेत. कॉँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच ज्येष्ठ नेते बाळासाहेब ठाकरे, यशोमती ठाकूर यांचा दारुण पराभव झालाय. तर, महायुतीमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. महायुती सरकारच्या नव्या मंत्रीमंडळात आता कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

एकीकडे महायुती सरकार स्थापनेसाठी तयारी करत असतानाच दुसरीकडे एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभेत अनेक दिग्गजांचा पराभव झाला. यावरच अॅड. असीम सरोदे यांनी एक पोस्ट लिहिली आहे. राज्यातील निकाल हे अनाकलनीय असल्याचं असीम सरोदे (Asim Sarode)यांनी म्हटलं आहे. त्यांची पोस्ट आता तूफान व्हायरल झाली आहे.

असीम सरोदे यांची फेसबुक पोस्ट-

अनेक जण जे निवडणुकीत हरले आहेत त्यांना निवडणूक निकाल चॅलेंज करायचे आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. मी आज अश्या अनेकांच्या फोन कॉल्स ला उत्तरे दिलीत. निवडणूक याचिका करतांना नेमके आक्षेप, प्राथमिक पुरावे आवश्यक असतात. केवळ भावनाशील होऊन हायकोर्टमध्ये चांगली पिटिशन होऊ शकत नाही.

मी उद्या शक्य झाल्यास याबाबत फेसबुक लाईव्ह करून निवडणूक याचिका करण्यासाठी आवश्यक माहिती देणार आहे. निवडणुकीला आव्हान देण्याचा हक्क केवळ हरलेल्या उमेदवारांना नाही तर कुणी त्या मतदार संघातील उमेदवार सुद्धा अशी याचिका करू शकतात.

निवडणूक निकाल अनाकलनीय लागले हे तर अगदी महायुतीतील अनेक नेत्यांना व कार्यकर्त्यांना माहिती आहे. आधी सुद्धा निवडणूका व्हायचे व लोक पराभूत व्हायचे पण निवडून आलेल्या व विजयी झालेल्या उमेदवारांच्या बाबत इतक्या शंका कधी नसायच्या. फ्री अँड फेअर निवडणूक प्रक्रियेसमोर विश्वासहार्यतेचे मोठे आव्हान आहे, अशी पोस्ट असीम सरोदे यांनी केली आहे. ते आज फेसबुक लाईव्हमध्ये काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा असतील. (Asim Sarode)

News Title – Asim Sarode post on Assembly Result

महत्त्वाच्या बातम्या-

पवार vs पवार सामना झालेल्या ‘त्या’ 40 जागांचा निकाल काय लागला?

महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?, पाहा संपूर्ण आकडेवारी

आज ‘या’ राशींना मिळणार भाग्याची साथ, देवी लक्ष्मी आर्थिक अडचणी करणार दूर!

मोठी बातमी! अटीतटीच्या लढतीमध्ये रोहित पवार विजयी, राम शिंदेंचा ‘इतक्या’ मतांनी पराभव

पराभवानंतर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…