मुंबई | दिल्लीत झालेल्या घटनेवर सध्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
रोज वचवच करणारे संजय राऊत कालच्या घटनेवर काही बोलले नाहीत. संजय राऊतांना माझा सवाल आहे की रोज कोणत्याही विषयावर बोलायला जमतं मग काल देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत?, असा सवाल आशिष शेलारांनी केला आहे.
आंदोलनात जो वावर आणि वाद पहिल्यापासून चालू आहे त्याचे समर्थन शरद पवार , संजय राऊत यांनी केलं. मग काल हे सगळं घडल्यावर शरद पवार, संजय राऊत तुमची तोंड आता का शिवली?, असंही शेलारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेवर संजय राऊत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
थोडक्यात बातम्या-
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात केलं दाखल!
“दिल्लीतील हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा कट”
दिल्लीत हिंसाचार करणारे शेतकरी नाहीत, ते तर देशद्रोही- सदाभाऊ खोत
“शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकार उदासीन असून ते शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे”
कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित घोषित करा- उद्धव ठाकरे
Comments are closed.