बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भास्कर जाधवांनी सभागृहात नौटंकी करण्यापेक्षा…”

मुंबई | प्रदिर्घ कालावधीनंतर राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन मुंबईमध्ये सुरू झालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीच्या कारणावरून पहिल्याच दिवशी गोंधळ झाला आहे. अशात शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानं गोंधळ वाढला आहे. परिणामी भाजप नेते अतुल भातखळकर यांनी भास्कर जाधव यांच्यावर टीका केली आहे.

अधिवेशनाच्या सुरूवातीलाच राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या एका दाखल्यानं वादाला तोंड फुटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचंड गाजलेल्या 15 लाख रूपयांच्या घोषणेची आठवण काढताना शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी मोदींची नक्कल केली आहे. यावरून भाजप नेत्यांनी चांगलाच गोंधळ घातला आहे.

भास्कर जाधव स्टँड-अप कॉमेडी का सुरू करत नाहीत?, विधानसभेत नौटंकी करण्यापेक्षा हा पर्याय बरा आहे, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. भास्कर जाधव यांनी आपल्या खास शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची नक्कल केल्यानं सभागृहात गदारोळ माजला आहे. भाजपकडून जाधव यांच्या निलंबनाची मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, भास्कर जाधव यांच्या या कृत्याचं समर्थन करणार नाही पण अध्यक्षांनी व्हिडीओ पाहून निर्णय घ्यावा, असं वक्तव्य राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे. भास्कर जाधव यांनीचं तालिका अध्यक्ष असताना गत अधिवेशनात भाजपच्या 12 आमदारांच निलंबन केलं होतं .

थोडक्यात बातम्या

“रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्यायला काही हरकत नाही”

“उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यातील नातं भाजप नेत्यांना कळणार नाही”

हिवाळी अधिवेशन: …म्हणून पहिल्याच दिवशी हिवाळी अधिवेशन स्थगित

पंतप्रधान मोदींची नक्कल केल्याने विधानसभेत राडा, भास्कर जाधवांवर फडणवीस संतापले

हिवाळी अधिवेशन: ‘तुम्हाला एकतरी परिक्षा घोटाळ्याशिवाय घेता येते का?’; फडणवीस कडाडले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More