आता पंतप्रधानांना विचारा… कोणत्या चौकात येताय?- राज ठाकरे

बीड | देशातील प्रत्येकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमच्या चौकात कधी येताय? याची विचारणा करणारी पत्रं लिहायला पाहिजे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते बीडमधील पत्रकार परिषदेत बोलत होते.

मोदींचा नोटबंदीचा निर्णय फसला आहे. नोटबंदीचा निर्णय जर चुकला तर मला चौकात उभे करून हवी ती शिक्षा द्या, असं मोदींनी सांगितलं होतं. त्याचाच उल्लेख करत राज ठाकरेंनी आमच्या चौकात कधी येता?, आमच्या चौकात येता की बाजूच्या देशाच्या चौकात येता?, असं विचारण्यास सांगितलं आहे.  

दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार नोटाबंदीनंतर पाचशे आणि हजार रूपयांच्या 99.30 टक्के नोटा परत आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं मोदींचा नोटाबंदीचा निर्णय फसल्याचं उघड झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-नव्या शनायाचा शोध संपला; पाहा कुणाला मिळाली ही मोठी संधी…

-सनी लिओनीची पंचाईत; शो रूममध्ये तासभर अडकून पडली

-महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांवर गडकरींचा आशीर्वाद- विलास मुत्तेमवार

-सुप्रिया सुळेंचा #SelfieWithPotHoles; बोपदेव घाटात कार्यकर्त्यांसोबत रस्त्यांची पाहणी

-सरकारच्या विरोधात बोलणे म्हणजे राष्ट्रद्रोह नव्हे- विधी आयोग