महाराष्ट्र मुंबई

“रात्री 8 वाजता यायचं, काहीही बोलायचं आणि निघून जायचं, असं काम आम्ही करत नाही”

मुंबई | रात्री 8 वाजता यायचं, काही बोलायचं आणि निघून जायचं, असं काम आम्ही करत नाही. आम्ही प्रत्येक गोष्टींमध्ये विचार करतो आणि मग कृती करतो, असा टोला मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.

विरोधकांना कोणाशी काही देणं घेणं नाही. पहिल्या दिवसापासून त्यांचं म्हणणं होतं की धार्मिक स्थळं उघडा, ट्रेन चालू करा, बस चालू करा, एसटी चालू करा, लोकांना एकत्र येऊ द्या. मात्र, असं चालत नाही. सरकार एका मतावर ठाम होती. टास्क फोर्सने जे काही सल्ले दिले त्या पद्धतीने आम्ही वागत गेलो, असं अस्लम शेख म्हणालेत.

जगाच्या पातळीवर महाराष्ट्राचं नाव चांगलं काम केलं म्हणूनच आलं आहे. तरीही लोक बाहेर पडत असतील तर त्यासाठी आयुक्तांनी लोकांना आवाहन केलं आहे, असं अस्लम शेख यांनी सांगितलं.

दरम्यान, पालिका आयुक्तांनी फक्त पब आणि बारबद्दल उदाहरण दिलं आहे. या ठिकाणी लोक गर्दी करत आहेत. बाहेर पडू लागल्याने नाईट कर्फ्यू लागला पाहिजे, असा त्यांचा विचार होता. परंतु सरकार या मताशी सहमत नाही. जर गरज वाटली तर आम्ही कारवाई करू शकतो. नाईट कर्फ्यू आणू शकतो, परंतु सध्या असं काही वाटत नाहीये. सध्या परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे. त्याला कोणताही राजकीय रंग देणं योग्य वाटत नाही, असं अस्लम शेख म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

शेतकरी आंदोलन सुरुच रहावं अशी काहींची इच्छा- देवेंद्र फडणवीस

“आमच्या टप्प्यात आला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतोच”

शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका- शरद पवार

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा- राम कदम

सरकारी कार्यालयातून जिन्स आणि टी-शर्ट हद्दपार; सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता नवीन ड्रेस कोड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या