महाराष्ट्र मुंबई

“खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंग करुन भाजपवाले वर आलेत”

मुंबई | खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंगकरुन भाजप पक्ष वर आला आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केला आहे.

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा आज मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अस्लम शेख बोलत होते.

गेल्या दहा-बारा वर्षात नवी मुंबईकरांसाठी काहीतरी करायची गरज होती. पण भाजपने केवळ खायचं काम केलं, अशी टीका अस्लम शेख यांनी केली.

खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅप करुन भाजप पक्ष वर आला आहे. भाजप चांगल्या लोकांच्या मागे ईडी लावत आहे. भाजप शिवसेनेसोबत इतकी वर्ष होती. ज्यांचं बोट धरुन तुम्ही महाराष्ट्रामध्ये आलात त्याच शिवसेनेला हे संपवायला निघाले होते. आता शिवसेना चांगलं काम करू लागली तर त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा काढला, असं अस्लम शेख म्हणाले.

थोडक्यात  बातम्या-

“बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की…”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदाराची थेट सुप्रिया सुळेंकडे मंत्रिपदाची मागणी!

“पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का?”

“25 वर्ष गणेश नाईकला लोकांनी मान्य केलंय, मी कुणाला घाबरत नाही”

शास्त्रीय संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या