महाराष्ट्र मुंबई

“ज्यांचं बोट धरुन महाराष्ट्रात आले त्याच सेनेला संपवण्याचा भाजपचा प्रयत्न”

मुंबई | ज्यांचं बोट धरून तुम्ही महाराष्ट्रामध्ये आला त्याच सेनेला हे सपवंत होते. आता शिवसेना चांगलं काम करतंय तर त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा काढला, असं म्हणत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी भाजपवर सडकून टीका केलीये.

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा आज मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ते बोलत होते.

खंडणी, ब्लॅकमेलिंग आनि किडनॅप करून भाजप वर आली आहे. तसेच आता भाजप चांगल्या लोकांच्या मागे ईडी लावत आहे, असं अस्लम शेख यांनी म्हटलंय.

नवी मुंबईची सध्याची परिस्थिती सर्व बघत आहेत. बदल का हवा? हा प्रश्न नवी मुंबईचा नाही तर देशाचा आहे. आता बदल हवा. धनदांडग्याना आता घरी बसवायची गरज आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेलं संविधान भाजप शिस्तबद्ध पध्दतीने संपवत आहे, अशी टीकाही अस्लम शेख यांनी केली.

थोडक्यात बातम्या-

संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही- अजित पवार

“शरद पवार यांचा गणेश नाईक यांच्यावर प्रचंड विश्वास होता, पण…”

“…तर मग काँग्रेसला कोपरापासून साष्टांग दंडवत, सत्तेसाठी एवढी लाचारी? कुठे फेडाल ही पापे सारी?”

कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच- उद्धव ठाकरे

“आम्हाला मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय, ‘आपल्यासाठी संभाजीनगर आणि संभाजीनगरच राहणार’”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या