Top News

“विश्व हिंदू परिषदेने धार्मिक स्थळांसाठी मोर्चे काढण्यापेक्षा, प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन करावं”

मुंबई | धार्मिक स्थळं उघडण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने आज एका मोर्चाचं आयोजन केलं. यावरून मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आजच्या घडीला धार्मिक स्थळं उघडणं हा जनतेच्या जीविताच्या सुरक्षिततेपेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे का?, असा सवाल केलाय.

धार्मिक स्थळ उघडण्यासाठी मोर्चा काढण्यापेक्षा प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यासाठी जर विश्व हिंदू परिषदेचे लोक रस्त्यावर उतरले असते, तर ते जनतेच्या फायद्याचं ठरलं असतं, असं अस्लम शेख यांनी म्हटलंय.

घसरणारा जीडीपी, वाढती बेरोजगारी या मुद्यांवर मौन बाळगायचं आणि विश्व हिंदू परिषदेसारख्या धार्मिक संस्थांना पुढे करुन आपला राजकीय अजेंडा चालवायचा, यावरुन भाजपाचे नेते किती खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करत आहेत, हे पाहायला मिळंत, असं अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सरकार धार्मिक स्थळं उघडण्यासाठी प्रयत्न करत आहे. लवकरच महाविकासआघाडी या संदर्भात एक आदर्श कार्यप्रणाली तयार करेल. आणि त्यानंतर महाराष्ट्रातील धार्मिक स्थळं उघडण्यात येतील, असं अस्लम शेख यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

दुपारी झोपण्यावरून चंद्रकांत पाटलांचा पुणेकरांना टोला, म्हणाले…

देवेंद्र फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला, ‘या’ सरकारी रुग्णालयात घेत आहेत कोरोनावरील उपचार

मी आता टेन्शन फ्री, इतरांना टेन्शन देण्याचं काम करणार- एकनाथ खडसे

महिलेने वाहतूक पोलिसाची कॉलर पकडून लगावली कानशिलात; व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या