बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात अंशत: लॉकडाऊनची शक्यता; ठाकरे सरकारमधील मंत्र्याने सांगितली ‘अंदर की बात’!

मुंबई | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. विशेषत: मुंबई आणि पुण्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस कमालीची वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. सरकारने निर्बंध लावून देखील नागरिक कोरोना नियम मोडतांना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला होता. आता वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एक महत्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीत लॉकडाऊनबाबत निर्णय होणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

नागरिकांनी सावध राहावं, आजही अनेक ठिकाणी गर्दी होत आहे, असं होणार असेल तर शेवटी सरकारला लॉकडाऊन शिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा अस्लम शेख यांनी दिला आहे.

कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. आपण सगळ्या सुविधा वाढवू शकतो पण आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी कसा करायचा?. मुंबईची परिस्थिती गॅससारखी झाली आहे, वेळीच रोखलं नाही तर कोरोनाचा स्फोट होईल, असं अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूच्या प्रमाणातही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे.वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आढावा बैठक घेतली. या बैठकीत पुणे जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कडक करण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

थोडक्यात बातम्या- 

पुण्यात कोरोनाचा कहर, लॉकडाऊनसंदर्भात अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पठ्ठ्या एक लाख रूपये किलोनं विकतोय ‘ही’ भाजी; वाचा देशात कुठे होतंय उत्पादन

लग्नाच्या दीड महिन्यानंतर बेबी बम्पसह फोटो शेअर करत दियाने दिली गुड न्यूज!

BCCI चा उद्धटपणा; विराट कोहलीने केलेल्या त्या टीकेला BCCI चं प्रत्युत्तर

धक्कादायक! मुलानं आत्महत्या केली तिथेच आईनेही आयुष्य संपवलं

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More