बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ज्यांनी आयुष्यात कधी बॅट पकडली नाही, त्यांची नावं स्टेडियमला दिली जाताहेत”

मुंबई | महाविकास आघाडी सरकारने माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांना राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचं, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं आहे. यावर बोलताना काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

राजीव गांधी यांनी देशात नवीन टेक्नॉलॉजी आणली. मात्र काही लोक जाणीवपूर्वक त्यांचं नाव काढत आहेत. त्यामुळं हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलाय. जेवढे ते नाव संपवण्याचा प्रयत्न करतील तेवढं त्यांचं नाव वरती येत राहील, असं अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.

नवीन योजना कुठलीही न आणता जुन्या योजनांची केवळ नाव बदलली जाताहेत. ज्यांनी आयुष्यात कधी बॅट पकडली नाही, त्यांची नावं स्टेडियमला दिली जाताहेत, असं म्हणत टीका अस्लम शेख यांनी मोदींवर टीका केली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावे असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून मेजर ध्यानचंद यांचं या पुरस्काराला नाव देण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“आम्ही तलवार, बंदुका घेऊन लढणारे, आज मराठा रस्त्यावर आंदोलन करतोय हे देशाचं दुर्देव”

‘तुमची इयत्ता कंची ?’; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल

सीमाभागातील गावे तात्काळ महाराष्ट्रात सामील करण्यात यावीत; अजित पवारांचं पंतप्रधानांना पत्र

ऑक्सिजनअभावी झालेल्या मृत्युबाबत दिलेल्या स्पष्टीकरणावरून संसदेत केंद्राचा ‘यु-टर्न’

व्यंकय्या नायडूंना सभागृहात अश्रू अनावर, भावूक होत म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More