देश

शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलीला दररोज मिळणार ‘इतके’ रुपये; आसाम सरकारने घेतला मोठा निर्णय

गुवाहटी | मुलींना शाळेत जाण्यासाठी आणि त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहित करण्याची गरज असते. तसेच, त्यांना पाठिंबा देण्याची अधिक आवश्यकता आहे. त्यामुळे मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आसाम सरकारने एक चांगला निर्णय घेतला असून त्याचे सोशल मीडियावर कौतुकही होत आहे..

आसाममध्ये शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीला वर्गामध्ये येण्यासाठी दररोज 100 रुपये मिळणार आहेत. एजन्सीच्या अहवालानुसार, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे, असं आसामचे शिक्षणमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले.

चालू महिन्याच्या अखेरीस दिवसाला 100 रुपयांची योजना सुरू केली जाईल. इतकेच नाही तर राज्य सरकार 12 वीच्या बोर्ड परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या मुलींना प्रज्ञान भारती योजनेंतर्गत 22,000 दुचाकींचं वाटप करणार आहे, असंही शिक्षणमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं.

या योजनेसाठी 144.30 कोटी रुपये खर्च केले जातील. राज्य बोर्डातून प्रथम श्रेणी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थीनींना सरकार स्कूटर भेट देणार आहे.

थोडक्यात बातम्या-

लोकसभा अध्यक्षांची लेक बनली आयएएस, पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश!

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, कोव्हिशील्ड लसीच्या निर्यातीवर बंदी

टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे तिसऱ्या खेळाडूची कसोटी मालिकेतून माघार

‘…तेव्हा तुमचे मुख्यमंत्री झोपा काढत होते का?’; सुभाष देसाई यांनी भाजपला फटकारलं

तेजस्वी सातपुते यांनी पोलीस दलासाठी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; गृहमंत्र्यांनीही केलं कौतुक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या