बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आसाम-मिझोराम वाद चिघळला; मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल

मुंबई | गेल्या कित्येक वर्षांपासून आसाम आणि मिझोराम या दोन राज्यात वाद सुरू आहे. त्यात सोमवारी पुन्हा ठिणगी पडली. आसाम आणि मिझोराम यांच्यात झालेल्या संघर्षात आसाम पोलिसांचे 6 पोलीस शहिद झाले. तर एका नागरिकाचा देखील मृत्यु झाला आहे. त्यानंतर आसाम सरकारने आक्रमक भूमिका घेत राजकीय शोकाची घोषणा केली. त्यानंतर आता पुन्हा वाद चिघळला आहे.

आसाम पोलिसांनी केलेल्या कृत्यामुळे आता आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मिझोराम पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. हत्येचा प्रयत्न आणि हत्येचा कट रचने असे गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आलेत. त्यामुळे त्यांना आता पोलिस चौकीत हजर रहावं लागणार आहे.

मिझोराम पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत आसामचे मुख्यमंत्री, 6 वरिष्ठ अधिकारी आणि 200 पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिझोरामचे पोलिस महासंचालक जाॅन एन यांनी याची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून हा वाद पेटला होता. त्यानंतर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.

दरम्यान, गृहमंत्र्याची भेट घेतल्यानंतर हा वाद मिटेल अशी शक्यता होती. मात्र हा वाद पुन्हा पेटला आहे. मिझोराम हे शांततेशीर राज्य आहे. तर आसाम संवेदनशील राज्य आहे. त्यामुळे आता आसाम मिझोरामच्या कारवाईवर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

चिंताजनक! कोरोनाच्या बदलत्या रूपानं लक्षणातही होतोय बदल

कमलप्रीत कौरनं रचला इतिहास; फायनलमध्ये धडक

“जनसामान्यांचं निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता गमावला”

कोरोनानंतर नोरोव्हायरसचा धुमाकूळ; इंग्लडमध्ये अलर्ट जारी

पुण्यातील ‘फुकट बिर्याणी’ ऑर्डर प्रकरणात मोठा ट्विस्ट!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More